Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ election period employee leave paripatrak ] : निवडणूक कामकाज कालावधीमध्ये अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या रजा अनुज्ञेय बाबत , विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती यांच्यामार्फत दिनांक 18 ऑक्टोबर 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरचे परिपत्रक जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी अमरावती अकोला , यवतमाळ , वाशिम, बुलढाणा यांच्या प्रति विभागीय आयुक्त अमरावती यांच्या वतीने सादर करण्यात आली आहेत . तसेच सदर परिपत्रकाच्या प्रती माननीय अप्पर मुख्य सचिव महसूल व वनविभाग तसेच माननीय प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी यांना सादर करण्यात आली आहे .
सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आली आहे की निवडणुकीच्या कालावधीत काही निवडणुकीशी संबंधित अधिकारी हे वैद्यकीय कारणास्तव रजेचे अर्ज सादर करतात . निवडणूक कालावधीतील जबाबदारीची आणि कालमर्यादित कर्तव्य पाहता , कुणालाही सबळ कारणाशिवाय रजा देणे योग्य नसल्याचे नमूद करण्यात आली आहेत .
तसेच वैद्यकीय कारणास्तव अर्ज सादर केलेल्या प्रकरणात , संबंधित अधिकाऱ्यांची त्वरित शासकीय वैद्यकीय मंडळामार्फत वैद्यकीय तपासणी करून , ते खरोखर शासकीय कामकाज करण्यास असमर्थ आहे किंवा नाही याची त्वरित खात्री करावी व त्यानंतरच पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.