Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ high court order about pension ] : स्वेच्छा निवृत्ती घेतले असल्यास , त्यास पेन्शन नाकारता येणार नाही . अशा प्रकारचा हायकोर्टाने महत्त्वपूर्ण निर्वाळा दिला आहे . अशा प्रकरणी निवृत्तीनंतरचे सर्व प्रकारचे लाभ देण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आली आहेत .
पेन्शन नियमानुसार एखाद्या कर्मचाऱ्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली असल्यास , त्याला पेन्शन नाकारता येणार नाही . अशा प्रकारची कोणतीही तरतूद नसल्याचे , उच्च न्यायालयाने नमूद केले आहे . या संदर्भात पुणे येथील शिक्षिका सविता पिंगळे यांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती . सविता पिंगळे ह्या ज्या वेळी संस्थेमध्ये रुजू झाल्या , त्यावेळी त्या संस्थेला अनुदान मिळत नव्हते . ज्यावेळी त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली त्यावेळी त्या संस्थेला शंभर टक्के अनुदान प्राप्त झाले .
त्यामुळे सविता पिंगळे यांना निवृत्तीनंतरचे सर्व प्रकारचे लाभ मिळाला हवेत , अशा प्रकारचा निर्वाळा न्यायमूर्ती मिलिंद साठ्ये व न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केली आहे . न्यायालयाने दिलेल्या आदेशात स्पष्ट केली आहे की , सविता पिंगळे यांना निवृत्तीची किती रक्कम देता येईल याची बेरीज 30 दिवसांमध्ये करण्याचे निर्देश देण्यात आले आहे . तर त्यांना दोन टप्प्यांमध्ये निवृत्तीचे पैसे देण्यात यावे असे नमूद करण्यात आली आहे .
त्याचबरोबर पहिला टप्पा हा दिनांक 15 डिसेंबर 2024 पर्यंत दिला जावा व त्यानंतर दुसरा टप्पा 15 जानेवारी 2025 पर्यंत दिला जावा अशा प्रकारचे आदेश न्यायालयाने प्रशासनाला दिले आहे . सविता पिंगळे ह्या सेवेचा कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदरच स्वेच्छा निवृत्ती घेतल्याने , त्यांना निवृत्तीचे लाभ देण्यास राज्य सरकारने नकार दिला होता .
सविता पिंगळे ह्या सण 1993 मध्ये शारदा पवार महिला कलानिकेतन या संस्थेमध्ये प्राध्यापक या पदावर नियुक्त झाल्या होत्या , त्यांना सन 1996 मध्ये सेवेमध्ये कायम करण्यात आले होते . परंतु आजारपणामुळे त्यांनी सन 2017 मध्ये स्वेच्छा निवृत्ती घेतली होती . यामध्ये त्यांनी सेवेचे वीस वर्ष कालावधी पूर्ण केला होता . यामुळे त्यांना निवृत्तीनंतरचे लाभ व पेन्शन लाभ राज्य सरकारने नाकारल्याने , त्यांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती , यावर सविता पिंगळे यांना अखेर न्याय मिळाला .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.