लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : दि.01.11.2005 रोजी किंवा त्यानंतर आणि दि.11.12.2019 पुर्वी नियुक्त झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करुन डीसीपीएस / एनपीएस टायर -1 खात्यातील जमा रकमा ERM प्रक्रियेद्वारे GPF खात्यांमध्ये वर्ग करणेबाबत कोषागार कार्यालयांकडून दि.07 जुन 2023 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार राज्यातील दुय्यम न्यायालयातील दि.01.11.2005 रोजी किंवा त्यानंतर आणि दि.11.12.2019 पुर्वी नियुक्त झालेल्या न्यायिक अधिकाऱ्यांच्या ( दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर , दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर जिल्हा न्यायाधीश व कौटुंबित न्यायालयातील न्यायिक अधिकारी ) डीसीपीएस / एनपीएस टायर – 1 खात्यामधील जमा रकमा ERM प्रक्रियेद्वारे GPF खाती वर्ग करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .
राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्याचे शासन निर्णय निर्गमित झाल्याने , सदर न्यायिक अधिकारी एनपीएस प्रणालीमध्ये ज्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकडे संलग्न दिसतात त्या कार्यालयाच्या कोषागार अधिकाऱ्यांना सदर ERM प्रणालीमध्ये ज्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकडे संलग्न दिसतात त्या कार्यालयाच्या कोषागार अधिकाऱ्यांना सदर ERM करण्याची विनंती करावी असे नमुद करण्यात आलेले आहेत .
हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांना DA करणेबाबत , कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन !
राज्य शासनांच्या दि.19.03.2020 रोजीच्या शासन निर्णयातील यादिमध्ये Annexure -A समाविष्ठ दि.01.11.2005 ते दि.11.12.2019 पुर्वी नियुक्त असलेल्या व कार्यालयाशी संलग्न असणाऱ्या न्यायिक अधिकाऱ्यांच्या प्रलंबित कारणे तसेच कार्यवाही पुर्ण असलेल्या प्रस्तावांची माहीती तात्काळ सादर करण्याचे आदेश अप्पर कोषागार अधिकारी ( एनपीएस शाखा ) यांच्या कडून देण्यात आलेले आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !