Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee October payment and festival advance update ] : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोबर महिन्याच्या वेतन देखा सोबत दिवाळी सण अग्रीमचा लाभ प्राप्त होणार आहे , त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्याचे वेतन महिना संपण्याच्या अगोदरच अदा केला जाणार आहे .
दिवाळी सणाची सुरुवात 26 ऑक्टोबर पासून होत असल्याने , कर्मचाऱ्यांना सणाकरिता , पगार महिना संपण्याच्या अगोदरच अदा केले जाणार आहे . याकरिता संबंधित आस्थापनेकडून पगार बिल दि.25 ऑक्टोबर पर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले गेले आहेत .
दिवाळी सण अग्रीम घेण्यासाठी संबंधित आस्थापना प्रमुख यांनी ज्या कर्मचाऱ्यांना दिवाळी सण अग्रीम हवे आहेत , त्यांचे अर्ज मंजुरी करिता सादर करायची आहे . जे कर्मचारी अस्थायी आहेत अशांनी जामीनदार कर्मचाऱ्यांचे नाव , पदनाम व सही सदर अर्जावर घेणे आवश्यक असेल .
सन अग्रीमाची रक्कम : दरवर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाच्या निमित्ताने 12500/- रुपये इतकी रक्कम दिवाळी सण अग्रीम म्हणून दिली जाते , सदरची रक्कम पुढील दहा महिन्याच्या वेतनातून प्रत्येकी 1250/- रुपये कपात करण्यात येते . सदरची रक्कम बिनव्याजी असल्याने , कर्मचाऱ्यांना परवडणारी आहे .
ऑक्टोबर वेतन : माहे ऑक्टोबर 2024 चे वेतन ऑक्टोबर महिन्यातच होणार असल्याची माहिती समोर येत आहे , कारण दिवाळी सण दि.26 ऑक्टोबर पासून सुरू होत असल्याने , कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाची खरेदी करण्याकरिता ऑक्टोबर महिन्याचे वेतन महिना अखेर अदा केले जातील .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.