Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra state employees old pension, Retirement age 60 year & new pay scale DA update ] : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याकरिता बऱ्याच दिवसापासून आंदोलने , मोर्चे काढण्यात येत आहेत . यामध्ये प्रमुख मागणी म्हणजे जुनी पेन्शन योजना (Old pension scheme ) जशाच्या तसे लागू करण्यात यावी . याकरिता नुकतेच महाराष्ट्र जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात आले , त्याचबरोबर सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष (Retirement age 60 year) करण्यात यावे , याशिवाय सातवा वेतन आयोगामध्ये असणाऱ्या वेतन त्रुटी दूर करून सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याबाबत , कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी मागणी केली जाते , याबाबत महत्त्वपूर्ण अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊयात .
सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करणे बाबत ,करण्यात आलेल्या मागणीवर राज्य सरकारकडून प्रस्ताव तयार करण्यात आलेला होता . सदर प्रस्तावाला काही आमदाराकडून तसेच बेरोजगार सुशिक्षित तरुणांकडून विरोध दर्शवण्यात आला , यामुळे सदर सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करणे बाबतचा प्रस्ताव प्रलंबित राहिला आहे . सदर निर्णयावर सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारची कार्यवाही मंत्रालयीन स्तरावर केली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहेत.
जुनी पेन्शन योजना : राज्य सरकारने सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना व केंद्र सरकारची एकीकृत पेन्शन योजना (UPS) यापैकी एक पेन्शन योजनेचा पर्याय निवडण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे . तर राज्य कर्मचाऱ्यांची असणारी जुनी पेन्शन योजना जसेच्या तसे लागू करण्यास , राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची हालचाली सुरू नाहीत . यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कर्मचाऱ्यांकडून Vote for Pension अभियान राबवली जाणार आहेत , ज्यामध्ये जो पक्ष जुनी पेन्शन देईल त्यालाच कर्मचाऱ्यांकडून मतदान केले जातील .
सुधारित वेतनश्रेणी : सातवा वेतन आयोगानुसार , काही पदांच्या वेतनश्रेणीमध्ये त्रुटी आढळून आल्या होत्या , सदर त्रुटींची पूर्तता करून सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याकरिता राज्य सरकारकडून समितीचे गठन करण्यात आले असून , सदर समितीकडून अहवाल 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत राज्य सरकारला सादर केला जाणार आहे . त्यामध्ये ज्या पदांच्या वेतनश्रेणीमध्ये त्रुटी आढळून आले आहेत , अशा पदांना सुधारित वेतनश्रेणी लागू केली जाणार आहे .
वाढीव महागाई भत्ता : सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2024 चा देय महागाई भत्ता (DA) बाबत केंद्र सरकारकडून अद्याप कार्यालयीन ज्ञापन निर्गमित न झाल्याने , सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्याचा लाभ निवडणुकीनंतरच दिला जाण्याची शक्यता आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.