Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ central government cabinet nirnay ] : दिनांक 09 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली . यामध्ये देशातील गरिबांना मोफत धान्य वितरण करणे संदर्भात मोठा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे .
सदर निर्णयामध्ये देशातील गरीब जनतेला पुढील चार वर्षे मोफत धान्य वितरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे . यानुसार आता सन 2028 पर्यंत गरिबांना मोफत धान्य पुरवठा केला जाणार आहे . याकरिता केंद्र सरकारकडून तब्बल 17,082 कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली आहे . देशातील नागरिकांचे ॲनिमिया त्याचबरोबर पौष्टिक कमतरता दूर करण्याकरिता सदर योजनेला मंजुरी देण्यात आली आहे .
सदर योजनेअंतर्गत फोर्टीफाईड भाताला प्रोत्साहन दिले जाणार आहेत , सदर योजना राबवण्याकरिता संपूर्ण खर्च हा केंद्र सरकारकडून केला जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे . म्हणजेच देशात जुलै 2024 ते माहे डिसेंबर 2028 पर्यंत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना व इतर कल्याणकारी योजना अंतर्गत देशातील गरीब नागरिकांना मोफत तांदळाचा पुरवठा करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे .
गरीब जनतेला मोफत तांदूळ पुरवठा केल्याने ,अन्नद्रव्यांची कमतरता त्याचबरोबर अशक्तपणा अशा समस्या दूर होणार आहेत , असा दावा करण्यात आलेला आहे . यामध्ये देशातील गरजू नागरिकांपर्यंत धान्याचा पुरवठा करण्याकरिता एक विशिष्ट साखळी विकसित केली जाणार आहे .
याकरिता केंद्र सरकारकडून 21 हजार तांदूळ कारखान्यांनी फोर्टीफाइड तांदळाची गुणवत्ता तपासण्याकरिता 52 प्रयोगशाळा तयार करण्यात आलेली आहेत . सदर तांदूळ वितरित करण्या करिता केंद्र सरकारकडून साखळी विकसित करण्याकरिता तब्बल 11000 /- कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे .