दि.07.10.2024 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्गमित करण्यात आले 5 महत्वपुर्ण शासन निर्णय ; पाहा सविस्तर .

Spread the love

Live Marathipeapr संगिता पवार प्रतिनिधी [ state employee imp shasan nirnay dated 07 October ] : दिनांक 07.10.2024 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 05 महत्वपुर्ण दिलासादायक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत . सविस्तर शासन निर्णय ( GR ) पुढीलप्रमाणे पाहुयात ..

कोतवालांना अनुंकपा धोरण लागु : राज्य शासन सेवेत कार्यरत कोतवाल या पदावरील कर्मचारी हे सेवेत असताना दिवंगत झाल्यास अथवा गंभीर आजार , अपघात यामुळे शासन सेवा करण्यास वैद्यकीय दृष्ट्या कायमचा असमर्थ ठरल्यास रुग्णता सेवानिवृत्त झाल्यास , त्या कुटुंबावर ओढावणाऱ्या आपत्तीत त्यांच्या कुटुंबियांना तातडीने मदत मिळण्याच्या उद्देशाने त्यांच्या वारसांना कोतवाल या पदावरील नियुक्ती ( अनुकंपा धोरणानुसार ) देण्यास मान्यता देण्यात आली आहे .

कोतवालांच्या मानधनात वाढ : राज्यात एकुण 12,793 कोतवाल कार्यरत आहेत , त्यांना दरमहा 15,000/- मानधनांमध्ये दि.01.04.2026 रोजीपासून 10 टक्के इतकी वाढ देण्यास मान्यता देण्यात आली आहे , त्यानंतर दर 03 वर्षांनी दि.01 एप्रिलपासुन त्यांना मिळणाऱ्या एकुण मानधनांमध्ये 10 टकके इतकी वाढ देण्यास मान्यता महसुल विभागांकडून मान्यता देण्यात आली आहे .

अंगणवाडी सेविका / मदतनीस कर्मचाऱ्यांना भाऊबीज भेट रक्कम मंजूर : राज्यातील अंगणवाडी सेविका / मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सन 2024-25 या आर्थिक वर्षात प्रत्येकी रुपये 2000/- प्रमाणे भाऊबीज भेट रक्कम देण्यास शासन मंजूरी देण्यात आली आहे .

राज्यातील तलाठी संवर्गातील अस्थायी पदांना मुदतवाढ : राज्यातील महसुल विभागातील जुन्या आकृतीबंधानुसार विभागनिहाय , जिल्हानिहाय तलाठी संवर्गाच्या मंजूर असणाऱ्या पदांपैकी 8575 पदे स्थायी असून , उर्वरित 4059 पदे अस्थायी आहेत , सदर पदांपैकी कोणतेही पद 06 महिन्यांपेक्षा अधिक काळासाठी रिक्त नसल्याचे सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांनी प्रमाणित केलेले आहेत , सबब 4059 अस्थायी पदांना दि.01.09.2024 ते दि.28.02.2025 पर्यंत मुदवाढ देण्यात येत आहे .

आश्वासित प्रगती योजना लाभ : राज्यातील उच्च शिक्षण संचालनालय व त्यांच्या अधिनस्त असणाऱ्या कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी , गट अ पदावर कार्यरत अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार 03 लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली आहे .

वरील सर्व शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment