Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ 8th pay commission stracture , pay scale , fitment factor , pension ] : केंद्र सरकारने कालच्या कॅबिनेट मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे . यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन / भत्ते तसेच पेन्शन धारकांच्या पेन्शन मध्ये वृद्धी दिसून येणार आहे .
नविन वेतन आयोगाची रचना : नविन वेतन आयोग हा फिटमेंट फॅक्टरच्या वृद्धीवर अवलंबून असते , ज्यामुळे मूळ वेतनात वाढ निर्धारित करण्यात येते . मुळ वेतनाच्या वाढीबरोबरच इतर देय असणारे भत्ते यांमध्ये महागाई भत्ता , घरभाडे भत्ता , प्रवास भत्ता या सारख्या भत्यांमध्ये वाढ केली जाईल .
फिटमेंट फॅक्टरमध्ये 2.28 ते 3.68 पट पर्यंत वाढवला जावू शकतो , ज्यामुळे किमान मुळ वेतन हे 18,000/- रुपये वरुन 26,000/- रुपये पर्यंत वाढू शकेल . तर इतर देय भत्त्यांमध्ये देखिल वाढ होणार आहे . ज्यामुळे कर्मचाऱ्यांचे एकुण वेतनात मोठी वाढ होईल .
कधीपासुन लागु करण्यात लागु होईल : नविन आठवा वेतन आयोग हा दिनांक 01 जानेवारी 2026 पासुन लागु करण्यात येणार आहे . कारण सातवा वेतन आयोगाची मुदत ही दिनांक 31.12.2025 रोजी संपुष्टात येणार आहे .
पेन्शनवृद्धी : नविन वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्ती वेतनांमध्ये देखिल वाढ होईल , ज्यांमध्ये किमान पेन्शनची 9000/- रुपयाची मर्यादा 2.28 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे 20,500/- रुपये पर्यंत वाढू शकते .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.