आठवा वेतन आयोग समितीची स्थापना लवकरच ; कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणीचा लाभ दि.01.01.2026 पासुनच ..

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ 8th pay commission new pay scale new update news ] : आठवा वेतन आयोग समितीची स्थापना करणेबाबत , आत्ताची घडीची मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर आली आहे . सदर प्राप्त माहितीनुसार , केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक 01.01.2026 पासुन सुधारित वेतनश्रेणीनुसार , लाभ देण्याच्या अनुषंगाने आठवा वेतन आयोग समितीची स्थापना करण्यात येणार आहे .

येत्या अर्थसंकल्पात आठवाा वेतन आयोगाची स्थापना : केंद्र सरकारचे दरवर्षी माहे फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन होते . येत्या फेब्रुवारी 2025 मध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनत्रेणीचा लाभ देणेबाबत , आठवा वेतन आयोग समितीची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रानुसार प्राप्त झाली आहे .

याबाबत केंद्रीय कामगार युनियन कडून वारंवार मागणी केली जात आहे . यामुळे सरकारवर दबाव वाढत असल्याने , नविन वेतन आयोगाची रचना बाबत अर्थसंकल्पात तरतुद केली जाणार आहे .

दिनांक 01 जानेवारी 2026 पासुन केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग लागु होणे आवश्यक आहे .त्या अनुषंगाने वेतन समितीची स्थापना करण्यात येणार आहेत . यांमध्ये वित्त मंत्रालयाचे सचिव हे प्रमुख असतील ..

केंद्र सरकारने नविन वेतन आयोग लागु केल्यानंतर महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु करणेबाबत , केंद्र सरकारने लागु केलेल्या नविन वेतनश्रेणी , फिटमेंट फॅक्टरचा अभ्यास करुन 02 वर्षांच्या अवधीनंतर दिनांक 01.01.2026 पासुनच नविन वेतन आयोग लागु करण्यात येईल .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment