7 व्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीतील त्रुटींचे निवारण समितीची मुदत संपली ; त्रुटी पुर्तता करुन सुधारित वेतन कधी लागु होणार ?

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ 7th pay commission new pay scale update ] : सातव्या वेतन आयोगानुसार , वेतन त्रुटींची पुर्तता करुन सुधारित वेतनश्रेणी लागु करणेबाबत , राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दि.16.03.2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार वेतनत्रुटी निवारण समितीचे गठण करण्यात आले होते .

तर वित्त विभागाच्या दि.11 सप्टेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार , सदर समितीस अहवाल तयार करण्यास दि.31.10.2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती . सदर मुदत यापुर्वी सहा महिने म्हणजेच 15.09.2024 पर्यंतच होती , परंतु त्रुटींचे प्रस्ताव तपासून अहवाल सादर करण्यासाठी 31.10.2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती .

सदर मुदत आता संपली आहे , परंतु राज्यात सध्या विधानभेच्या निवडणूका सुरु असल्याने , सदर अहवाल आता पुन्हा धुळ खात पडणारी की काय असा सवाल कर्मचाऱ्यांच्या मनात पडत आहे . कारण आता निवडणूकीनंतर राज्यात सदर अहवालाची चर्चा होईल काय , त्यास मंजूरी कधी मिळेल , यातच नविन वेतन आयोग येवून लागेल . तो पर्यंत तरी वेतनत्रुटी निवारण होणे आवश्यक असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे .

अहवालाची सद्यस्थिती : प्राप्त माहितीनुसार सदर वेतनत्रुटी निवारण समितीकडून प्राप्त प्रस्तावांचा अभ्यास करुन , सुधारित वेतनश्रेणी देणेबाबत , सविस्तर अहवाल तयार करण्यात आलेला असून , सदर अहवाल निवडणूकामुळे प्रलंबिल झाला आहे .

पंरतु निवडणुकीनंतर सदर अहवाल मंजुरी साठी पाठविण्यात येईल , त्यानंतरच राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनत्रुटी मध्ये सुधारणा होवून नविन सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यात येईल . सदरच्या सुधारित वेतनश्रेणी ह्या दि.01.01.2016 पासून लागु करण्यात येणार आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment