Live Marathipepar संगिता पवार , प्रतिनिधी [ 7 th Pay Commission New Payment Scale shasan Rajapatra ] : सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागु करणेबाबत राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 17 ऑक्टोंबर 2023 रोजी महत्वपुर्ण / दिलासादायक शासन राजपत्र निर्गमित करण्यात आलेला आहे .
महाराष्ट्र राज्यातील खाजगी शांमधील कार्यरत कर्मचारी ( सेवेच्या शर्ती ) विनियमन अधिनियम 1977 च्या नियम 16 पोट नियम 2 चा खंड ब नुसार प्राप्त करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र राज्य शासनांकडून सदरचा सुधारित वेतनश्रेणी बाबतचा शासन राजपत्र निर्गमित करण्यात आलेला आहे .यांमध्ये सहाव्या वेतन आयोगांनुसार देण्यात आलेली वेतनश्रेणी व सुधारित वेतन श्रेणी नमुद करण्यात आलेली आहे .
महाराष्ट्र राज्यांमध्ये महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी विनियमन 1977 अंतर्गत कार्यरत शाळांमधील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी सदर सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यात आलेली आहेत .सदर सुधारित वेतन श्रेणी ह्या दिनांक 01 जानेवारी 2016 पासूनच लागु करण्यात आलेल्या आहेत , यामुळे आता सदर नमुद कर्मचाऱ्यांना वेतन फरकाची रक्कम देखिल प्राप्त होणार आहे .
यांमध्ये राज्यातील म्युनिसिपल स्कूल बोर्ड / कॅन्टोन्मेंट बोर्ड / म्युनिसिपल काऊन्सिल व खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वेतनश्रेणींमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे .तसेच प्रशिक्षित अपदवीधर , विशेष शिक्षक यांमध्ये चित्रकला शिक्षक , शारिरीक प्रशिक्षण निदेशक , संस्कृत शिक्षक , हिंदी शिक्षक , मुलोद्योग शिक्षक , संगित शिक्षक ,तसेच अधक्षिक , मुख्य लिपिक , ग्रंथपाल , वरिष्ठ लिपिक , प्रयोगशाळा सहाय्यक , कनिष्ठ लिपिक अशा पदांच्या वेतनश्रेणीमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे .
तर वर्ग – 4 मध्ये प्रयोगशाळा परिचर , माळी , नाईक , तेलवाला , यंत्र परिचर , शिपाई , पहारेकरी , रात्र पहारेकरी , चौकीदार , सफाईगार , कामाठी , परिचर , प्रयोगशाळा हमाल अशा पदांच्या वेतनश्रेणींमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे .
तसेच अध्यापक विद्यालयातील शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी मध्ये सातव्या वेतन आयोगानुसार सुधारणा करण्यात आलेली आहे .तसेच अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी मध्ये देखिल मोठी सुधारणा करण्यात आलेली आहे .
या संदर्भातील सुधारित वेतनश्रेणी बाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 17 ऑक्टोंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन राजपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .
सुधारीत वेतनश्रेणी शासन राजपत्र (PDF)
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.