Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Employee 7 th Pay Commission Da Rates ] : सातव्या वेतन आयोगानुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना शुन्य टक्के ते 50टक्के पर्यंतची वाढ पुढील तक्त्याप्रमाणे सविस्तर आकडेवारीच्या माध्यमातुन माहिती विषद करण्यात आलेली आहे .

राज्यातील कर्मचाऱ्यांना 01 जानेवारी 2023 पासून नविन सातवा वेतन आयोग लागु करण्यात आला यावेळी महागाई भत्ताचा दर हा शुन्य टक्के होता . त्यानंतर माहे जुलै 2016 मध्ये 2 टक्के वाढ करण्यात आली तर माहे जानेवारी 2017 मध्ये 2 टक्के तर माहे जुलै 2017 मध्ये 1 टक्के डी.ए वाढ करण्यात आली .

त्यानंतर माहे जानेवारी 2018 मध्ये 2 टक्के डी.ए वाढ करण्यात आली त्यानंतर माहे जुलै 2018 मध्ये 2 टक्के तर माहे जानेवारी 2019 मध्ये 3 टक्के तर माहे जुलै 2019 मध्ये 5 टक्‍के वाढ करण्यात आली त्यानंतर कोरोना महामारीमुळे जानेवारी 2021 पर्यंत महागाई भत्ता गोठविण्यात आला .

त्यानंतर माहे जुलै 2021 मध्ये थकित 18 महिने कालावधीतील 11 टक्के व माहे जुलै 2021 मध्ये 03 टक्के असे एकुण 14 टक्के डी.ए वाढ लागु करण्यात आली .त्यानंतर माहे जानेवारी 2022 मध्ये 03 टक्के त्यानंतर जुलै 2022 , जानेवारी 2023 व जुलै 2023 मध्ये प्रत्येकी 4 टक्के डी.ए वाढ लागु करण्यात आली .सदर डी.ए वाढ व एकुण महागाई भत्ता दर टक्के पुढीलप्रमाणे पाहुयात ..

महागाई भत्ता देय तारीखवाढ टक्केएकुण महागाई भत्ता टक्के
01.01.2016नाहीनाही
01.07.20160202
01.01.20170204
01.07.20170105
01.01.20180207
01.07.20180209
01.01.20190312
01.07.20190517
01.01.2020
01.07.2020
01.01.2021
01.07.20211431
01.01.20220334
01.07.20220438
01.01.20230442
01.07.20230446

यानंतर आता केंद्र सरकारने दि.01 जानेवारी 2024 पासुन DA मध्ये आणखीन 4 टक्के वाढ लागू करण्यात आली आहे , हि DA वाढ राज्य कर्मचाऱ्यांना देखिल पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येणार आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *