या शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार 2 वर्षाची पगारी सुट्टी! कोण असतील लाभार्थी? पहा सविस्तर;

Spread the love

7th Pay Commission Latest News : प्रशासनाने अखिल भारतीय सेवेमध्ये कार्यरत असलेल्या पात्र सदस्यांकरिता ज्या काही सुट्ट्या लागू केल्या आहेत, त्याबाबत असलेल्या नियमांमध्ये आणखी सुधारणा केली आहे. आता या माध्यमातून ह्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या संपूर्ण शासकीय नोकरीच्या कालखंडात दोन वर्षाची पगारी सुट्टी ते अगदी बिनधास्तपणे घेऊ शकतात (7th Pay Commission pay matrix). ही जी सुट्टी आहे ती प्रशासनाच्या माध्यमातून दोन मुलांच्या संगोपनासाठी दिली गेली असून जास्तीत जास्त दोन वर्षापर्यंत शासकीय कर्मचारी प्रशासनाच्या माध्यमातून सुट्टी घेऊ शकतात.

जुन्या पेन्शन बाबत संभ्रम दूर करण्याचे निर्देश दिले उच्च न्यायालयाने! नवीन शासन निर्णय निर्गमित करण्याबाबत राज्य सरकारच्या सूचना;

डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग यांनी मागील काही दिवसांमध्येच एक नवीन निर्णय जाहीर केला असून, आता या जाहीर केलेल्या निर्णयाप्रमाणे 28 जुलै रोजी याचे संपूर्ण कामकाज लागू होईल (7th Pay Commission salary). या निर्णया अंतर्गत प्रशासनाने राज्य सरकार सोबत सल्लामसलत केली आहे (AIS). भारत देशातील शासकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या राज्याच्या नियमांमध्ये 1995 मध्येच सुधारणा केली असून, आता जे AIS शासकीय कर्मचारी असतील त्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन प्रदान केले जाईल.

दोन मुलांची काळजी घेण्याकरिता दोन वर्षांची रजा;

अखिल भारतीय सेवेमध्ये कार्यरत असलेल्या आयएस च्या सर्व पुरुष व महिला सदस्यांना त्यांच्या दोन मुलांची काळजी घेण्याकरिता त्यांच्या संपूर्ण सेवेच्या दरम्यान 730 दिवसांची सुट्टी दिली जाईल. आजारी शिक्षणासाठी किंवा तत्सम याशिवाय पालकत्व अशा विविध काळजींसाठी अठरा वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच प्रशासनाच्या माध्यमातून ही रजा ते घेऊ शकतील. चाईल्ड केअर लिव्हच्या माध्यमातून शासकीय कर्मचाऱ्यांना संपूर्ण सेवेच्या कालखंडात पहिला जो काही 365 दिवसांचा कालखंडा असेल त्यामध्ये पूर्ण पगार दिला जाईल आणि दुसऱ्या कालखंडामध्ये म्हणजे दुसऱ्या 365 दिवसांमध्ये 80 टक्के पगार देण्यात येईल (7th Pay Commission salary calculator maharashtra). अधिसूचना जाहीर केल्याप्रमाणे चिल्ड्रन लिव्ह खाते या सोबतच इतर सुट्ट्यांमध्ये त्या सुट्ट्या एकत्रित केल्या जाणार नाहीत. या माध्यमातून आता एक स्वातंत्र्य खाते असणार आहे आणि ते शासकीय कर्मचाऱ्यांना स्वतंत्रपणे प्रदान केले जाईल.

हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे काय? या पॉलिसीचा नागरिकांना कसा फायदा होईल? जाणून घ्या सविस्तर-

Leave a Comment