Live Marathipepar सोनाली पवार प्रतिनिधी [ Aikaki Post Kalabaddha Padonnadi Vetannishchiti ] : सातव्या वेतन आयोगानुसार एकाकी पदावर कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या कालबद्ध पदोन्नतीची वेतननिश्चिती बाबत आपण या लेखांमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत .
ज्या पदांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नाहीत अशा पदांना एकाकी पद असे संबोधले जातात , अशा पदावर कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जानेवारी 2006 पुर्वी काही वेतनश्रेण्या ठरवून देण्यात आलेल्य होत्या त्यानुसार वेतन श्रेणीत वेतन निश्चिती नियम 11 ( 1 ) ( ए ) च्या तरतुदीप्रमाणे करण्यात होत्या . दिनांक 01 जानेवारी 2006 पासून सदर तरतुदीमध्ये बदल करण्यात आलेला आहे . एकाकी पदाच्या कालबद्ध पदोन्नती बाबतीत त्यांच्या वेतन बँडमध्ये बदल होणार नाही असे नमुद आहेत .
एकाकी पदांवरील पदांना सहाव्या वेतन आयोगांनुसार कालबद्ध पदोन्नतीची वेतननिश्चिती करत असताना , मुळ पदाचे ग्रेड वेतन व कालबद्ध पदोन्नती वेतननिश्चिती करीता देण्यात येणारे अतिरिक्त पदाचे ग्रेड वेतन बाबतचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे .
अ.क्र | मुळ पदाचे ग्रेड वेतन | कालबद्ध वेतनश्रेणी मध्ये अतिरिक्त पदाचे ग्रेड वेतन |
01. | 2000 पेक्षा कमी वेतन | 200/- |
02. | 2000 ते 4000 पर्यंत | 300/- |
03. | 4000 ते 5000 पर्यंत | 400/- |
04. | 5000 पेक्षा पुढे | 500/- |
सदर वरील अतिरिक्त पदाचे ग्रेड वेतन ही संकल्पना दिनांक 01 जानेवारी 2016 पासून रद्द करण्यात आले आहे , तर सातव्या वेतन आयोगानुसार एकाकी पदाच्या कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देताना मुळ वेतन स्तराच्या ( वेतन बँड + ग्रेड वेतनाशी निगडीत वेतनस्तर ) पुढील वेतनस्तरात लाभ मंजुर करण्यात येईल व पदोन्नतीचे वेतन हे निश्चित करण्यात येईल .
समजा X या एकाकी पदाचे सातव्या वेतन आयोगानुसार मुळ वेतन स्तर हे एस – 6 आहे तर प्रथम लाभानंतरचा वेतनस्तर हे एस – 7 असेल , तर द्दितीय लाभानंतरचा वेतनस्तर हे एस – 8 असेल तर तृतीय लाभनंतरचा वेतनस्तर हे एस – 9 असेल .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.