Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ 7 th pay commission sudharit sevantrgat pragati yojana ] : वित्त विभाग मार्फत राज्यातील कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेंच्या ( 7 व्या वेतन आयोगानुसार ) तीन लाभ लागु अनुज्ञेयतेबाबत दि.02 मार्च 2019 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

7 व्या वेतन आयोगाच्या काळांमध्ये दहा , वीस , तीस वर्षांची सलग नियमित सेवा नंतरच्या 03 लाभांची सुधारित सेवांतर्गत प्रगती योजना ही दिनांक 01 जानेवारी 2016  पासून पुढीलप्रमाणे लागू करण्यात येत आहेत . यांमध्ये नमुद करण्यात आलेल आहेत कि , सुधारीत आश्वासित प्रगती योजना ही वेतन मॅट्रीक्स मधील वेतनस्तर एस – 20 पर्यंत वेतन घेणाऱ्या पे बँड 15600-39100 व ग्रेड पे रुपये 5400/- या वेतन संरचनेशी समकक्ष कर्मचारी / अधिकारी यांना लागु असणार आहेत , तर संबंधित कर्मचारी / अधिकारी हे कोणत्याही कारणांमुळे वेतनस्तर एस – 21 मध्ये वेतन आहरीत करु लागतील तेव्हा त्यांना सदर नविन योजना अंतर्गत लाभ अनुज्ञेय राहणार नसल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .

पुर्वी 12 व 24 वर्षांच्या सेवा नंतर मिळणारे लाभ , 7 व्या वेतन आयोगात 10,20 व तीस वर्षांच्या सेवा नंतर पात्रतेनुसार अनुज्ञेय केले आहेत , त्यामुळे ज्या कर्मचारी / अधिकारी यांना दिनांक 01 जानेवारी 2016 पुर्वी अनुज्ञेयतेनुसार यथास्थिती पहिला व दुसरा लाभ मंजूर झालेला आहे अशा अधिकारी / कर्मचाऱ्यांना उर्वरित यथास्थिती 2 रा व तिसरा लाभ पुढील तक्यानुसार अनुज्ञेय राहणार आहे .

दि.01.01.2016 पुर्वी 12 वा 24 वर्षाच्या सेवा नंतर घेतलेला लाभदुसऱ्या लाभाची अनुज्ञेयतातिसऱ्या लाभाची अनुज्ञेयता
पहिला लाभपहिल्या लाभापासुन 8 वर्षानंतर ( 12 + 8 )दुसऱ्या लाभापासुन 10 वर्षानंतर ( 20 + 10 )
दुसरा लाभलागु होणार नाहीदुसऱ्या लाभांपासुन 06 वर्षांनतर ( 24 + 06 )

दिनांक 01 जानेवारी 2016 व त्यानंतरच्या पदोन्नतीच्या वेळी म.ना.सेवा ( सुधारित वेतन ) नियम 2019 या अधिसुचनेतील नियम क्रमांक 13 नुसार वेतननिश्चितीचा लाभ अनुज्ञेय केला जाणार असल्यामुळे त्याच तरतुदीनुसार पदोन्नतीच्या साखळीतील पदावरील पदधारकास नविन योजनांमध्ये वेतननिश्चितीचा लाभ अनुज्ञेय राहणार असल्याचे नमुद करण्यात आहेत .

तसेच एकाकी पदावरील कर्मचारी / अधिकारी यांना यापुर्वीच्या योजनां नुसार दिनांक 01 जानेवारी 2016 पुर्वीच पहिला लाभ मंजूर करण्यात आला आहे . अशा कर्मचाऱ्यांना त्यांची 20 ( 12+08 ) वर्षांची सेवा ही दिनांक 01 जानेवारी 2016 पुर्वी होत असल्यास , संबंधितास 2 लाभ हा सदर निर्णयांमध्ये नमुद केल्याप्रमाणे पुढील वेतनस्तर लागु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *