Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ 7 th pay commission installment ] : सातवा वेतन आयोगाची थकबाकी अदा करणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून , राज्यातील शासकीय / जिल्हा परिषदा तसेच निवृत्तीवेतनधारकांना माहे जुन पेड इन जुलै वेतन / निवृत्तीवेतन देयकासोबत अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
सदर नमुद शासन निर्णयांमध्ये एनपीएस धारक / निवृत्तीवेतनधारकांना सातव्या वेतन आयोगाचा हप्ता रोखीने तर भविष्य निर्वाह निधी योजना लागु असणाऱ्यांना सदर सातव्या वेतन आयोगाच्या 5 वा हप्त्याची रक्कम ही व्याजासह GPF खात्यांमध्ये जमा करण्याचे निर्देश आहेत . परंतु ज्या कर्मचाऱ्यांचे DCPS / NPS खाते नसतील , अशा कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम अदा करणेबाबत , विभागीय शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत दिनांक 05 जुलै 2024 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे .
श्री.शेख अब्दुल रहीम , राज्यप्रवक्ता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन यांच्या सदंर्भाधिन पत्रांनुसार डीसीपीएस / एनपीएस खाते नसलेल्या शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगाची थकबाकी रोखीने मिळणेबाबत , सहाय्यक संचालक विभाग शिक्षण उपसंचालक कार्यालय छ.संभाजीनगर मार्फत मा.शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या प्रति परिपत्रक सादर करण्यात आला आहे .
सदर परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , डीसीपीएस / एनपीएस खाते नसलेल्या शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी रोखीने मिळणेबाबत , श्री.शेख अब्दुल रहीम राज्यप्रवक्ता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन मार्फत निवेदन प्राप्त झाले असून सदर निवदनावर पुढील कार्यवाहीस्तव व मार्गदर्शनास्तव विनंती करण्यात आलेली आहे .
