40 वर्षावरील राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) ; पाहा सविस्तर ..

Spread the love

Live Marathiepapar संगिता पवार प्रतिनिधी [ 40 years state employee imp shasan nirnay ] : राज्य शासन सेवेत वय वर्षे 40 व त्यापेक्षा अधिक वर्षे असणाऱ्या राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय राज्य शासनांच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे .

सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत दिनांक 22.04.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार , राज्य सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय तपासणी धोरण निश्चित करण्यात आलेले आहेत .यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , राज्यातील वय वर्षे 40-50 या वयोगटामधील सर्व सरकारी अधिकारी / कर्मचारी यांना 02 वर्षातून एकदा तर वय वर्षे 51 व त्यावरील सर्व सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांना वर्षातुन एक वेळा वैद्यकीय ( Medical ) तपासणी अनुज्ञेय करण्यात आलेली आहे .

सदरची वैद्यकीय तपासणी करीता अधिकारी / कर्मचाऱ्यांस रुपये 5000/- रुपये रकमेपर्यंत खर्च प्रतिपुर्ती अनुज्ञेय करण्यास मान्यता दिली गेली आहे .राज्यातील सरकारी अधिकारी / कर्मचारी यांनी सरकारी / निमसरकारी रुग्णालये तसेच वैद्यकीय महाविद्यालये येथे वैद्यकिय चाचण्या केल्यास , त्या नि-शुल्क अथवा नाममात्र शुल्क असल्याने , त्यांची प्रतिपुर्तीची एकुण मर्यादा ही 5000/- रुपये इतक्या रकमेपर्यंत असणार आहे .

सदर वैद्यकीय चाचणींचा केवळ 01 दिवस हा कर्तव्यकाळ म्हणून समजला जाईल .परंतु त्याबाबत आपल्या आस्थापनेच्या कार्यालय प्रमुखांस अवगत करणे आवश्यक राहील . सदर वैद्यकीय चाचणी केल्याच्या नंतर वैद्यकीय प्रतिपुर्ती करीता आपल्या कार्यालय प्रमुखांस सादर करावा .

सदरच्या चाचण्या ह्या केवळ वय वर्षे 40 वर्षे व त्यावरील अधिकारी / कर्मचाऱ्यांनाच लागु राहणार आहेत . सदर वैद्यकीय चाचण्यांचा सविस्तर तपशिल खाली नमुद शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेला आहे .

शासन निर्णय (GR)

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment