Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Teacher Post D.ed stop New B.ed Pattern ] : देशभरामध्ये सुरु असणारा शिक्षक पात्रता करीताचा बी.एड अभ्यासक्रम आता कायमचा बंद होणार आहे , त्याऐवजी बी.एड हा अभ्यासक्रम पुढील शैक्षणिक वर्ष सन 2024-25 पासुन सुरु होणार आहे . सदर चार वर्षांच्या विशेष बी.एड रिहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडिया ( RCI ) ने मान्यता दिलेली आहे .
सदर नविन अभ्यासक्रमानुसार देशाभरातील सुमोर 1000 संस्था तसेच विद्यापीठाने सदरचा नविन अभ्यासक्रम लागु केला आहे असे RCI कडून स्पष्ट केले आहेत . RCI चे सचिव विकास त्रिवेदी यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकांमध्ये NCTE मार्फत नविन शैक्षणिक धोरणांमध्ये एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम मध्ये चार वर्षांचा बी.एड कार्यक्रमाची तरतुद करण्यात आलेली आहे . यामुळे RCI ने देखिल केवळ 04 वर्षांचा बी.एड अभ्यासक्रम चालविण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे .
विशेष बीएड अभ्यासक्रम असा असणार : विशेष बीएड मध्ये शिक्षकांना दिव्यांग असणाऱ्या मुलांना शिकविण्यासाठीचे प्रशिक्षण दिले जाणार आहेत . त्याचबरोबर दिव्यांगा विद्यार्थ्यांच्या विशेष गरजा लक्षात घेवून या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दिले जाणार आहेत . यांमध्ये वाक् , दृष्टिदोष , मानसिक अपंगत्व , तसेच श्रवण अशा अपंगाकरीता अभ्यासक्रम चालविण्यात येणार आहेत .
NCTE कडून विशेष बीएड एकात्मिक अभ्यासक्रम करीता नविन अभ्यासक्रम तयार करण्यात येत आहेत . हा अभ्यासक्रम आरसीआय मार्फत राबविण्यात येणार आहेत . सदरचा NCTE चा अभ्यासक्रम हा विद्यार्थ्याााच्या आवश्यक गरजांनुसार तयार करण्यात येणार आहेत . चार वर्षांच्या बी.एड मुळे शिक्षक पदांकरीता आवश्यक असणारी संपुर्ण ज्ञान अद्यावत होईल , ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ते मध्ये वाढ होण्यास सहाय्य होईल .