सन 2024 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करणेबाबत , महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित GR दि.27.12.2023

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : सन 2024 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करणेबाबत , राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सन 2024 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिनांचे कार्यक्रम सदर निर्णयासोबत जोडलेल्या परिपत्रकांनुसार मंत्रालयात व सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयात साजरे करण्यात यावेत अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत .तसेच परिशिष्टात दर्शविलेल्या कार्यक्रम सार्वजनिक सुट्टी , साप्ताहिक सुट्टी ( शनिवार व रविवार ) आणि स्थानिक सुट्टीच्या दिवशी येत असतील आणि या संदर्भात शासनाने कार्यक्रमात बदल सुचविल्यास त्याप्रमाणे साजरे करण्यात यावेत अन्यथा त्याच दिवशी साजरे करण्यात यावेत अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

विभागीय आयुक्त / जिल्हाधिकारी यांनी त्याच्या विभागातील तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयात सदर कार्यक्रम आयोजित करण्याबाबत , आवश्यक त्या सुचना निर्गमित करुन त्यांच्या अंमलबजावणीबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निेर्देश देण्यात आलेले आहेत .

भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतारदिनाच्या समावेश जयंती कार्यक्रमामध्ये करण्याबाबत वेगळ्याने शासन परिपत्रक निर्गमित करण्यात येईल असे सदर परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत . सदरच्या परिपत्रकानुसार सन 2024 मध्ये एकुण 44 जयंत्या व राष्ट्रीय दिन साजरा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

या संदर्भात सदर शासन परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेल्या जयंती / राष्ट्रीय दिनांची यादी पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

जयंती / राष्ट्रीय सण यादी शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here

Leave a Comment