Live marathipepar संगीता पवार, प्रतिनिधी [ 18 month DA farak ] : केंद्र सरकार अधिनस्त सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना कोरोणा कालावधीमधील 18 महिने महागाई भत्ता गोठवण्यात आलेला होता . या कालावधीमध्ये महागाई भत्त्यामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ सरकारकडून करण्यात आलेली नव्हती . केंद्र सरकारच्या धर्तीवरच महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांचे / पेन्शन धारकांचे देखील डीए (महागाई भत्ता ) गोठवण्यात आलेला होता .
दिनांक 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 दरम्यानच्या कालावधीमध्ये देशांमध्ये कोरोना महामारी मोठ्या प्रमाणात पसरलेली होती , या संकटाचा सामना करण्याकरिता सरकारकडून सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या डीए मध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नव्हती . यामुळे यादरम्यान सेवानिवृत्त झालेले कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युईटी व इतर देयाकामध्ये मोठी मोठी तफावत होत आहे .
यामुळे पेन्शनधारकांकडून सदर 18 महिने कालावधीमधील महागाई भत्त्याचा लाभ मिळावा अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आलेली आहे . यामध्ये नमूद करण्यात आले आहे की , 18 महिने कालावधी मधील महागाई भत्त्याचा एकत्रित लाभ किंवा DA वाढ बाबत वन टाईम सेटलमेंट करण्यात यावीत अशी विनंती करण्यात आलेली आहे .
18 महिने कालावधी मधिल DA लाभ मिळणार का ? : केंद्र सरकारकडून सदर अठरा महिने कालावधी मधील महागाई भत्ता संदर्भात यापूर्वी स्पष्टीकरण देताना नमूद करण्यात आली आहे की , सदर कालावधी मधील महागाई भत्ता हा देशांमधील आर्थिक संकटाचा सामना करण्याकरिता सदरचा निधी इतर आर्थिक सोयी सुविधा करिता वापरण्यात आलेला असून , सदर काळामध्ये सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांचा महागाई भत्ता हा स्थिर ठेवण्यात आलेला आहे .
म्हणजेच सदर कालावधीमध्ये देशांमध्ये सरकारी कर्मचारी कामावर कार्यरत होते , यामुळे सदर कर्मचाऱ्यांना DA वाढीचा लाभ मिळण्याचा अधिकार आहे . तसेच न्यायालयीन प्रकरणातील सदर कालावधीमध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ सेवानिवृत्तीच्या कालावधीनुसार , अदा करण्यात आलेला आहे . यामुळे इतर कर्मचाऱ्यांना देखील सदर अठरा महिने कालावधी मधील DA लाभ मिळण्याची अपेक्षा आहे .
पुढील वर्षांमध्ये लोकसभा व अनेक राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका होणार असल्याने , देशातील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या प्रलंबित मागण्या लवकरच पूर्ण होणार आहेत . सदर 18 महिने कालावधी मधील महागाई भत्ता चा लाभ मिळावा याकरिता केंद्रीय पेन्शन धारकाकडून वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहेत .
मीडिया रिपोर्टच्या मिळालेल्या माहितीनुसार , सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना सदर अठरा महिने कालावधीमधील महागाई भत्त्याचा लाभ मिळावा , याकरिता केंद्रीय JCM सचिवाकडून कॅबिनेट सचिवांना अहवाल सादर करण्यात आलेला आहे. या अहवालास मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी प्राप्त झाल्यास , कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना 18 महिने कालावधीमधील डीए लाभ प्राप्त होईल .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.