Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ 16 February Bharat Band Ghoshana ] : शेतकरी तसेच रोजंदारी मजूर त्याचबरोबर तरुण यांच्या संदर्भातील अनेक समस्यांचे कारण देत शेतकरी संघटनांकडून दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे . यांमध्ये देशातील विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येवून लढा देण्यात येणार आहेत .
या भारत बंदची प्रमुख कारण म्हणजे नोएडा आणि ग्रेटर नोएडामधील सुमारे 100 गावांतील हजारो शेतकऱ्यांच्या जमीने अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत , परंतु त्यानां हवे तसे शेतीचा मोबदला दिला गेला नाही . यामुळे गुरुवारी सदर 100 गावांतील हजारो शेतकरी अधिग्रहीत केलेल्या जमिनीच्या वाढीव मोबदला आणि भूखंड मिळावेत या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आणि संसदेकडे मोर्चा वळवला , मात्र पोलिसांना त्यांना रोकले . शेतकऱ्यांच्या आंदोलनांमुळे दिल्लीत सुरक्षा अधिकच कडक करण्यात आली आहे .
यामुळे शेतकऱ्यांने उत्तर प्रदेश मधील गौतम बुद्ध नगर जिल्हातील नोएडा आणि ग्रेटर नोएडा प्राधिकरण कार्यालयाच्या समोर शेतकऱ्यांनी आंदोन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे . यापुर्वी पोलिस आणि जिल्हा प्रशासन यांच्या सोबत झालेली बैठक निष्फळ झाल्याने शेतकऱ्यांना हा निर्णय घेतला आहे . यांमध्ये भारतीय किसान युनियनच्या शेतकऱ्यांने सांगितले आहेत कि ,पुढील आठवड्यांमध्ये संसदेचे अधिवेशन संपणार आहेत .
सदर अधिवशन मध्ये शेतकऱ्यांच्या वरील नमुद प्रश्नांवर तोडगा न निघाल्यास पुन्हा दिल्ली कडे कुच करणार असल्याचे सांगितले आहेत . तर भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री.राकेश टिकैत यांनी सांगितले आहे कि दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी देशांमध्ये भारत बंद करण्यात येणार आहे . दरम्यान शेतकरी हे दिल्लीकडे आगेकुच करणार आहेत . यामुळे देशभर संपुर्ण चक्का जाम होणार आहे .
दिनांक 16 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजुपासुन ते सांयकाळी 4 वाजेपर्यंत भारत बंद पाळला जाणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते राकेश टिकैत यांनी सांगितले आहेत , तर या धाकेला शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे .