Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ 04 cabinet nirnay about state employee ] : राज्य शासनाची काल दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठक संपन्न झाली . सदर बैठकीमध्ये विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले , यामध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत चार महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आली आहेत .
आश्वासित प्रगती योजना / वरिष्ठ निवड श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत जिल्हा त्याचबरोबर प्रादेशिक परीविक्षा व अनुरक्षण संघटनेच्या मार्फत चालवली जाणारी बालगृहे व निरक्षणगृहे यामधील कार्यरत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना त्याचबरोबर शिक्षकांना वरिष्ठ तसेच निवड श्रेणी लागू करणे संदर्भात , सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे .सदर शिक्षकांना चटोपाध्याय आयोगाने लागू करण्यात आलेली निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी निर्णयाच्या अनुषंगाने सदर शिक्षकांना थकबाकी देणे करिता 02 कोटी 71 लाख व प्रतिवर्षी 68 लाख 56 हजार रुपये इतकी रक्कम खर्च करण्यास सदर निर्णयानुसार , मान्यता देण्यात आली आहे .
कर दात्यांची हित लक्षात घेता GST अधिनियमांमध्ये सुधारणा : सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये करदात्यांचे हित लक्षात घेऊन महाराष्ट्र वस्तू व सेवा कर 2024 प्रारूपास सुधारणा देण्यास मंजुरी देण्यात आली आहे . यामध्ये करदात्यांचे अडचणी कमी व्हाव्या म्हणून सदरचा निर्णय घेण्यात आला आहे . तसेच केंद्रीय वस्तू व सेवा कर कायदा 2017 आणि राज्याचा वस्तू व सेवा कर कायदा 2017 यामध्ये एकसूत्रता आणण्याकरिता सदर सुधारणा करण्यात आलेली आहे .
ग्रामसेवक , ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरणातून ग्रामपंचायत अधिकारी हे पद : ग्रामीण पातळीवर जिल्हा परिषदेचे प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेवक ग्राम विकास अधिकारी या पदाचे अधिकारी कार्यरत असतात . या दोन्ही पदांचे एकत्रीकरण करून “ग्रामपंचायत अधिकारी” या पदाची निर्मिती करण्यात आली आहे . यामध्ये सातव्या वेतन आयोगानुसार ग्रामसेवक (S – 8 ) व ग्रामविकास अधिकारी (S – 12 ) या पदांचे नाव आता ग्रामपंचायती अधिकारी असे करण्यात आले आहेत . तसेच नव्याने ग्रामपंचायत अधिकारी पदाकरिता दहा वर्षांच्या सेवेनंतर सेवेचा पहिला लाभ विस्तार अधिकारी S – 14 तर वीस वर्षांच्या सेवेनंतर दुसरा लाभ सहाय्यक गटविकास अधिकारी S – 15 तर तीस वर्षांच्या सेवेनंतर गटविकास अधिकारी S – 20 असा लाभ मिळेल .
जलसंपदा विभागातील कर्मचार्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी : राज्य शासन सेवेतील जलसंपदा विभाग अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना वरिष्ठ निवड श्रेणी लागू करण्यासंदर्भात सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे . यामध्ये नमूद करण्यात आले आहे की , ज्या कर्मचाऱ्यांना शासन निर्णय दिनांक 29 सप्टेंबर 2003 नंतर कामानुसार हुद्दा व हुद्यानुसार वेतनश्रेणी लागू करण्यात आलेली आहे . अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या हुद्दा व हुद्यानुसार , वेतनश्रेणी दिनांक 29 सप्टेंबर 2003 पासून लागू करण्याचा व सदर अनुज्ञेय थकबाकीची रक्कम अदा करणे संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.